खड्ड्यात बुडून इसमाचा मृत्यू
वरोरा:- तालुक्यातील आशी गावातील अशोक लक्ष्मण देठे वय 50 वर्षे या इसमाचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना 12 जुलै रोजी आशी या गावी सायंकाळच्या सुमारास घडली.
अशोक लक्ष्मण देठे हे शेतात रोज मजुरीचे काम करीत होते. नेहमीप्रमाणे शेतात फवारणी करण्यासाठी म्हणून गेले, फवारणीचे काम आटोपून गर्मीमुळे होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा म्हणून पाण्याच्या खड्ड्यात त्यांनी उडी घेतली. मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन सदर इसमाचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन करीत आहे.