कुरखेडा:- कॅचबिल लावलेल्या ट्रक्टरच्या कचाट्यात सापडत एका दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. मनिष यादव लोहबंरे (24) रा. वाकडी असे मृतकाचे नाव आहे.
मनिष हा आज सकाळी आपल्या दुचाकीने सकाळी 9 वाजताच्या सुमारास कुरखेडाकडे येत होता व समोरून शेतात चिखल करण्याकरीता कॅचबिल लावलेला ट्रॅक्टर जात होता. दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात मनिष हा ट्रॅक्टरच्या कॅचबिलमध्ये सापडल्याने त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला. ट्रक्टर वाकडी येथीलच शेतकर्याचा आहे.
या घटनेबाबत कुरखेडा पोलिस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालक सचिन लालाजी मेश्राम रा. वाकडी याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 281, 106 (1), सह कलम 184 या नविन मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास साहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलिस करीत आहेत.