विधान परिषद निवडणूक निकाल Legislative Council Election Results

Bhairav Diwase

पंकजा मुंडेंसह भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय

मुंबई:- विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवारांचा विजय झाले आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.

आतापर्यंत हाती आलेलेल्या निकालानुसार, पंकजा मुंडे यांना २६ मते, योगेश टीळेकर यांना २६ मते, परिणय फुके यांना २६ मते, तर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी २६ मते मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मतमोजणी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या मतांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी केवळ २३ मतांची आवश्यकता होती. या २३ मतांचा कोटा भाजपाच्या पाचही उमेदवारांनी पूर्ण केला आहे.