चंद्रपूर:- पधरवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात मोठे व मध्यम प्रकल्प भरले आहेत. मोठ्या प्रकल्पापैकी सावली तालुक्यातील आसोला मेंढा हा तीन दिवसांपुर्वी तर रविवार नागभिड तालुक्यातील घोडाझरी ओव्हर फ्लो झाला आहे. शनिवार रात्री पासून सुरू झालेला पावसाचा जोर आज दिवसभरही कायम आहे. जिल्ह्यात एकूण 8 मोठे व मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आसोला मेंढा व इरई धरण हे दोन मोठे तर घोडाझरी, नलेश्वर, चंदई, नलेश्वर, चारगाव,अंमलनाला, लभानसराड,पगडीगुड्डम, डोंगरगाव आदी आठ मध्यम प्रकल्प आहेत. 15 जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. तेंव्हापासून तर सध्यास्थितीत कधी मंद तर कधी वेगवान होऊन संततधार सुरू आहे. त्यामुळे पंधरवाड्यात जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम प्रकल्प भरले आहेत.
सर्वात मोठा प्रकल्प सावली तालुक्यातील आसोलामेंढा तलाव चार दिवसांपूर्वीच ओव्हर फ्लो झाला. अडीच फुटाने सांडव्यातून पाण्याच विसर्ग होत आहे. मध्यम प्रकल्पापैकी नागभिड तालुक्यातील घोडाझरी तलाव आज रविवारी ओव्हर फ्लो झाला आहे. तर नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड आणि डोंगरगाव तलावही ओव्हर फ्लो झाले आहे. चंद्रपूर तालुक्यातील इरई धरण हा पूर्ण क्षमतेने भरले आहे.