भाजपा तालुकाध्यक्ष, महामंत्री यांचे नावे जाहीर #chandrapur

Bhairav Diwase
0
जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा
चंद्रपूर:- भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांनी नवनियुक्त तालुका अध्यक्ष आणि महामंत्री यांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये राजुरा तालुका,राजुरा शहर,कोरपना, गोंडपिपरी, जीवती, सावली, सिंदेवाही येथील भाजपा तालुका अध्यक्ष व महामंत्री यांचा समावेश आहे.एकूण ६ तालुका अध्यक्ष, १ शहर अध्यक्ष आणि २१ महामंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राजुरा तालुका अध्यक्षपदी सुनिल उरकुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, बाळनाथ वडस्कर हे राजुरा तालुक्याचे महामंत्री असतील.सुरेश रागीट हे राजुरा शहराचे अध्यक्ष असतील. मिलिंद देशकर,सचिन डोहे, अनंता येरणे, श्रीनिवास पांझा यांना महामंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आहे. कोरपना तालुक्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय मुसळे असतील. त्यांना महामंत्री म्हणून सतीश उपलेंचीवार, प्रमोद कोडापे, विजय रणदिवे हे सहाय्य करतील. गोंडपिपरी तालुकाध्यक्षपदी दीपक सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निलेश पुलगमकर, गणपती चौधरी, सतीश वासमवार हे महामंत्री असतील. जिवती तालुकाध्यक्ष म्हणून दत्ता राठोड यांची नियुक्त करण्यात आली आहे. येथे प्रल्हाद मदने, तुकाराम वारलवाड, माधव नेवळे, गोविंद टोकरे हे महामंत्री असतील.

अर्जुन भोयर यांची नियुक्ती सावलीच्या तालुकाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे. सतीश बोम्मावार, सचिन तंगडपल्लीवार हे सावलीचे महामंत्री असतील. सिंदेवाही तालुकाध्यक्ष म्हणून श्रीराम डोंगरवार हे काम पाहणार आहे. नागराज गेडाम, मुरलीधर मडावी हे येथे महामंत्री असतील.
नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री. हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष श्री. हरीश शर्मा, आमदार श्री. कीर्तीकुमार भांगडीया, आमदार श्री. रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते श्री. चंदनसिंहजी चंदेल, माजी जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे,माजी आमदार प्रा. श्री. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे,महानगराचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे, प्रदेश भाजपा चिटणीस विद्या देवाडकर, महामंत्री संध्याताई गुरनुले, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे,विवेक बोढे, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार श्री. जैनुद्दीन जव्‍हेरी, श्री. सुदर्शन निमकर, भाजपा नेते श्री. अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते श्री. विजय राऊत, श्री. प्रमोद कडू, श्री. राजेंद्र गांधी, श्री. रमेश राजूरकर आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)