कोरपना:- २०२४ च्या विधानसभेचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) शरद जोगी यांनी सुद्धा विधानसभेसाठी कंबर कसली आहे. येत्या काही दिवसात जोगी मुंबई वारीसाठी निघणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जोगी हे गडचांदूर नगर परिषदचे उपनगराध्यक्ष या पदावर असून सामजिक कार्यात नेहमी मोठा हातभार लावतात. तशी राजुरा विधानसभेत सुद्धा पक्ष बांधणी जोरात सुरू आहे आहे. मात्र महायुती सरकार मध्ये राजुरा विधानसभेत कुणाला तिकीट मिळणार हे सांगणे शक्य नाही मतदार राजा यावेळेस कुणाला निवडून देईल हे चित्र निवडणुकीतच पुढे येईल.
जोगी ने सामाजिक क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे अनेक कार्यक्रमात समारंभात जोगींचा मोठा हातभार असतो त्यामुळे सामाजिक संस्था संघटना हे जोगीच्या मागे उभे आहे असे एकंदरीत वाटत आहे ते मुंबई गेल्यानंतरच काय होणार हे माहित पडेल एकंदरीत राजुरा विधानसभेत अनेक पक्ष आपल्याला तिकीट मिळतील या आशेवर आहे. जोगिंच्या मुंबई वारी नंतरच काय होईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.