विसापूर येथे ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण #chandrapur

Bhairav Diwase
0
सरदार पटेल महाविद्यालयाद्वारे आयोजन
चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विसापूर ग्रामपंचायत येथे ‘हर घर तिरंगा’ आणि ‘उन्नत भारत अभियान’ अंतर्गत दत्तक गाव विसापूर येथे ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

सर्वत्र ‘हर घर तिरंगा’ आणि ‘उन्नत भारत अभियान’ राबविले जात आहे. त्याच अंतर्गत येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे दत्तक गाव विसापूर येथे ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, विसापूर ग्रामपंचायतचे सरपंच वर्षाताई कुळमेथे, ग्राम विकास अधिकारी किशोर धकाते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, प्रा. विक्की पेटकर, विसापूर ग्रामपंचायतचे सदस्य दिलदार जयकर, विद्या देवांलकर, शशिकला जिवने, प्रदिप गेडाम, संतोष निपुंगे लिपिक, अशोक ठूनेकर ग्रा.पं कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार ,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी या उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)