चंद्रपूर:- सन 2022-23 या वर्षातील चंद्रपुर जिल्हयातील पोलीस शिपाई व बॅन्डसमन रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर चंद्रपुर जिल्हयातील पोलीस भरतीची जाहिरात दिनांक 01/03/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी 137 पदे, बॅन्डसमन 09 पदे देण्यात आली होती. सदर पदांसाठी एकुण 22,531 इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते. पोलीस शिपाई पदासाठी दिनांक 19/06/2024 ते दिनांक 12/07/2024 पर्यंत मैदानी चाचणी व दिनांक 28/07/2024 रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. बॅन्डसमन पदासाठी दिनांक 15/07/2024 ते दिनांक 19/07/2024 पर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली व त्यासाठी लेखी परिक्षा दिनांक 02/08/2024 रोजी घेण्यात आली असुन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई पदाचे एकुण 137 रिक्त पदांकरीता महाराष्ट्र राज्यातुन पुरूष 13,421, महिला 6,297 असे एकुण 19,718 उमेदवारांचे अर्ज चंद्रपुर जिल्हयातील पोलीस भरती करीता प्राप्त झाले होते. त्यापैकी लेखी परिक्षेकरीता पुरूष 879, महिला 440, तृतीयपंथी 02 असे एकुण 1,321 उमेदवार लेखी परिक्षेकरीता पात्र झाले. त्यापैकी 1303 उमेदवारांनी लेखी दिली. त्यामध्ये 91 पुरूश उमेदवार, 46 महिला उमेदवार असे एकुण 137 उमेदवारांची पोलीस शिपाई पदी नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ऽ बॅन्डसमन पोलीस शिपाई यांची एकुण 09 पदाकरीता पुरूष 2,168, महिला 645 असे 2,813 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पुरूष 08, महिला 03 असे एकुण 11 उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र झाले होते. त्यापैकी पुरूष 06, महिला 02 अशा एकुण 08 उमेदवारांना नियुक्त पत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशा प्रकारे एकुण 146 रिक्त पदांपैकी 145 पदांची निवड प्रक्रिया पुर्ण झाली असुन 71 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आलेले आहेत. उर्वरीत उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे सुरू असुन निवडपात्र उमेदवार चंद्रपुर जिल्हा पोलीस मुख्यालयात लवकरात लवकर कर्तव्यार्थ हजर होतील.
या 145 निवड झालेल्या उमेदवारांमध्ये खुले प्रवर्ग 08, अनु. जाती. 30, अनु. जमाती 18, भटक्या जमाती ब 01, भटक्या जमाती ड 03, वि.मा. प्र. 01, इ.मा. व. 45, आर्थिक दुर्बल घटक 19, एस.ई.बी.सी. 20 याप्रमाणे समावेश आहे.
सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे सप्टेंबर-2024 अखेर पर्यंत मुलभुत प्रशिक्षणाकरीता पाठविण्यात येेणार आहे.