गडचिरोली:- आपल्या आजुबाजुला बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत मदत कुठुन मिळवून देता येईल, याकरिता कोठे संपर्क करावा, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशा संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरीता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत/ संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईनसेवा 1098 संपुर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. ही हेल्पलाईन सेवा दररोज २४ तास उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर दूरध्वनीद्वारे गरजू बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाद्वारे करण्यात आले आहे.
बालकांनो, संकटकाळात टोलफ्री क्रमांक 1098 ची मदत घ्या! #Gadchiroli #Chandrapur
बुधवार, सप्टेंबर ०४, २०२४
0