दोन बलात्कारांच्या घटनेनं हादरला चंद्रपूर जिल्हा! #chandrapur #Ballarpur #rape #Arrested

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत, २२ वर्षीय मंदबुद्धी मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंदू बालू भुक्या (वय ५५) या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी पीडितेच्या राहत्या वॉर्डातील रहिवासी असल्याचे समजते.

तर दुसऱ्या घटनेत, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला चार तरुणांनी ऑटोत बसवून तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी गुन्हा घडवून आणल्यानंतर तिला पुन्हा शहरात सोडून दिले. या घटनेनंतर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

बल्लारपूर ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी स्क्वॉड दोन्ही घटनांचा तपास करत आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात उभे करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)