मुंबई:- मध्यवर्ती कारागृह नागपूर विभागासाठी शिपाई भरतीची लिखित परीक्षा (Written Exam) 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. एकूण 255 पदांसाठी ही भरती घेतली जात आहे.
लिखित परीक्षेसाठी पात्र महिला उमेदवारांचे परीक्षा केंद्र काटोल रोडवरील पोलिस मुख्यालयात आणि पुरूष उमेदवारांचे केंद्र मानाकपूर विभागीय क्रीडा संकुलात असणार आहे. परीक्षेची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 4.30 वाजतापर्यंत असेल. सर्व उमेवारांना केंद्रात 1 वाजताच उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी 2.30 वाजतानंतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. पात्र उमेदवार नागपूर पोलिस आणि (https://policerecruitment2024.mahait.org) या संकेत स्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. काही तांत्रिक कारणामुळे प्रवेशपत्र डाऊनलोड होऊ शकले नाही तरी पात्र उमेदवार केंद्रावर येऊ शकतात. अधिक महितीसाठी पोलिस आयुक्त कार्यलयात जाऊन मदत घेता येईल.
उमेदवारांनी सोबत महाआयटीकडून जारी प्रवेशपत्र आणि मैदानी चाचणीदरम्यान पोलिसांनी दिलेले प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ओळख पटविण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसंस किंवा व्होटिंग कार्डसोबत चार पासपोर्ट साईज फोटो आणणेही आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगरानीत असेल आणि कॅमेऱ्यांची लाईव्ह रेकॉर्डिंग केली जाईल. ओळख पटविण्यासाठी बायोमेट्रिक तपासण्यात येईल. बोगस उमेदवार किंवा आक्षेपार्ह वर्तन झाले तर कायदेशिर कारवाई केली जाईल. डायरी, पुस्तक, स्मार्ट फोन, घड्याळ, कॅलक्यूलेटर आणि दुसरे कोणतेही ईलेक्ट्रॉनिक डिव्हाईससोबत प्रवेश प्रतिबंधित असेल.