पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण.
राजुरा:- ( राहुल थोरात );- स्थानिक भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय तथा मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या माँ शक्ती गरबा महोत्सव 'दादाचा दांडिया' ची महाअंतिम स्पर्धा काल (दि. १०) राजुराकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह मोठ्या थाटात पार पडली. या महाअंतिम स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आवर्जून उपस्थित राहून विजेत्या स्पर्धकांना बक्षीसांचे वितरण केले.
भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही राजुरा शहरात माता कन्यका परमेश्वरी मंदिर परिसरातील मैदानावर मॉं शक्ती गरबा महोत्सव - दादाचा दांडियाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते; मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या दांडियाची महाअंतिम स्पर्धा काल घेण्यात आली.
याठिकाणी परीसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनश्री किन्नाके, विनिता मालवीय, सारीका जेणेकर, इशीता काळे, करूना जांभुळकर, कौशल्याबाई चिंचाळकर, वनिता उराडे, सिमा देशमुख व राधा विरमलवार या नवदुर्गांचा सत्कारही आयोजकांकडून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध वयोगटातील विजेत्यांसह मिस्टर व मिस राजुरा ठरलेल्या विजयी स्पर्धकांना पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते बंपर बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतातून दादाचा दांडिया'च्या उत्तम आयोजनाबद्दल पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आयोजन समितीचे कौतुक करून उपस्थितांना विजयादशमी व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंचावर विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सचिव संजय उपगण्लावार, दिलीप गिरसावळे, महामंत्री मिलिंद देशकर, नितीन वासाडे, अनंता येरणे, सचिन डोहे, गणेश रेकलवार, राधेश्याम अडाणीया, विलास बोनगिरवार, अभय पोशेट्टीवार, प्रशांत गुंडावार, छबिलाल नाईक, अजय राठोड, आकाश गंधारे, सचिन बल्की, प्रणय विरमलवार, मनोहर आईटलावार, भाऊराव चंदनखेडे, विनोद नरेन्दुलवार, स्वप्निल राजुरकर, योगेश येरणे, महेश रेगुंडवार, सुरेश धोटे, लक्ष्मन निरांजने, गणेश वाघमारे, यशोधरा निरांजने, माया धोटे, उज्ज्वला जयपुरकर, प्रिती रेकलवार, शितल वाटेकर, प्रियदर्शनी उमरे, ममता केशेट्टीवार, शुभांगी रागीट, रजनी बोढे, गौरी सोनेकर, लक्ष्मी बिस्वास, अर्चना भोंगळे, आशा चंदनखेडे, सरीता नरेंदुलवार, महेश झाडे, अंकुश कायरकर, सचिन भोयर, मयुर झाडे, परीक्षक मनोज कोल्हापूरे, सुनैना तांबेकर, रिंकु मरस्कोल्हे, हितेश गाडगे, रुपेश कोमरवेल्लीवार, लुकेश होकम, मिथुन थिपे, समीर बेदावार यांचेसह मोठ्या संख्यने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व राजुरा वासीय जनतेची उपस्थिती होती.