अगोदरच अरविंद वर्मा यांची युवक काँग्रेस शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी; नंतर भाजप प्रवेश #Chandrapur

Bhairav Diwase


बल्लारपूर:- बल्लारपूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद वर्मा हे विकासाची कास धरण्याचा निर्णय घेतला. अरविंद वर्मा यांच्यासह प्रकाश वर्मा, मनोज निषाद, संदिप झिमान अशा १०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मात्र भाजपा प्रवेश करण्या अगोदरच 3 ऑक्टोबरला अरविंद चु. वर्मा यांना पदावरून आणि पक्ष सदस्यत्वावरून हटवण्यात आल्याचे पत्र मोहम्मद जुनेद सिद्दीकी अध्यक्ष बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस यांनी काढले.

काय म्हटले पत्रात...

या पत्राद्वारे कळविण्यात येते की, अरविंद चु. वर्मा यांचा पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याने त्यांची पक्ष सदस्यत्व आणि युवक काँग्रेस बल्लारपूरच्या शहराध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात आले.