Join BJP: बल्लारपुरात काँग्रेसला गळती; युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष भाजपात! Chandrapur Ballarpur

Bhairav Diwase


बल्लारपूर:- लोकसभेतील यशामुळे हुरळून गेलेली महाविकास आघाडी आतून पोखरली जात आहे. खंदे नेते महायुतीमध्ये सामील होताना दिसत आहेत. आता तर सुधीर मुनगंटीवार यांचा गड असलेल्या बल्लारपुरात काँग्रेसच्या अध्यक्षाने पक्षातील जाचाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचा पदाधिकारी पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसला घाम फुटलेला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे इनकमिंग जोरात सुरू आहे. अनेक विद्यमान आमदारांनी आपल्या कार्याचा अहवाल जनतेपुढे ठेवायला सुरुवात केली आहे. यात विदर्भात बल्लारपूरची जागा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गड मानला जाते. दिला शब्द केला पूर्ण , या तत्वावर ते काम करतात. त्यामुळे विरोधकांना विशेषतः काँग्रेसला निरर्थक टीका करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. काँग्रेसकडे प्रचारासाठी देखील मुद्दे नाहीत. त्यामुळे आपली पोळी शिजणार नाही, हे त्यांना माहिती आहे.

असे असले तरीही ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेसचेच नेते आपल्या पक्षाची ऐशीतैशी करत आहेत. मागासवर्गीयांचे नेतृत्व करणारे बल्लारपूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद वर्मा याच राजकारणाचे शिकार बनले आणि त्यांनी आपला मार्ग निवडला. काँग्रेसच्या जाचाला कंटाळून त्यांनी विकासाची कास धरण्याचा निर्णय घेतला. अरविंद वर्मा यांच्यासह प्रकाश वर्मा, मनोज निषाद, संदिप झिमान अशा १०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसचा पराभव निश्चित 

बल्लारपूरमध्ये काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. मुनगंटीवारांच्या बाजुने जनमत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा त्यांच्या मतदानावर यत्किंचितही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट आहे. याउलट गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे तर जनमत वाढलेले असून याची जाणीव महाविकास आघाडीलाही आहे. त्यामुळे यंदा काँग्रेसचा निश्चित पराभव आहे.