Kishor Jorgewar: आ. जोरगेवार उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार?

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र त्यातच इच्छुक नेते उमेदवारीसाठी पक्षांतरे करत आहेत. चंद्रपूर येथे महायुतीला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे २३ तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. जयंत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जोरगेवार हे मुंबईत शरद पवारांच्या भेटीला जाणार असून चर्चा सकारात्मक झाल्यासं ते उद्याला शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. किशोर जोरगेवार तुतारी चिन्हावर लढणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.