Maharashtra Assembly Elections: सहा विधानसभा मतदारसंघात 30 उमेदवारांचे नामांकन अवैध! वाचा सविस्तर?

Bhairav Diwase
चंद्रपूर:- नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी आज (दि. 30) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे नामांकन अवैध ठरले.

70 – राजूरा विधानसभा मतदारसंघात 2 अवैध : अवैध नामांकनामध्ये अरुण रामचंद्र धोटे आणि वामन उध्दवजी आत्राम यांचा समावेश आाहे.


71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 17 जणांचे अवैध : अवैध नामांकनामध्ये भुवनेश्वर पद्माकर निमगडे, कोमल किशोर जोरगेवार, मोरेश्वर कोदूजी बडोले, विशाल शामराव रंगारी, अरुण देविदास कांबळे, बबन रामदास कासवटे, आशिष अशोक माशीरकर, स्नेहल देवानंद रामटेके, संजय निळकंठ गावंडे, ज्ञानदेव भजन हुमणे, देवानंद नामदेवराव लांडगे, भीमनवार संजय परशुराम, राहुल अरुण घोटेकर, प्रवर्तन देवराव आवळे, महेश मारोतराव मेंढे, प्रतीक विठ्ठल डोरलीकर, अशोक लक्ष्मणराव मस्के यांचा समावेश आहे.

72 बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात अवैध निरंक : अवैध नामांकनाची संख्या निरंक

73 - ब्रम्हपुरी मतदारसंघात 2 अवैध : अवैध नामांकनामध्ये चक्रधर जांभुले (कृतीशील गणराज्य पक्ष) आणि पराग सहारे (अपक्ष).

74 – चिमूर मतदारसंघात 4 अवैध : अवैध नामांकनामध्ये धनराज रघुनाथ मुंगले (काँग्रेस), दांडेकर भाऊराव लक्ष्मण (काँग्रेस), राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी) आणि ॲङ हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष)

75 - वरोरा मतदारसंघात 5 अवैध : अवैध नामांकनामध्ये दिनेश दादाजी चोखारे (इंडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष), रमेश कवडुजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी व अपक्ष), नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष), अंबर दौलत खानेकर (राष्ट्रीय समाज पक्ष) आणि सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.