Ballarpur : 'या' उमेदवारांच्या उमेदवारीने बल्लारपुरचे गणित बिघडणार...!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन फार्म दाखल करण्याचे अंतिम क्षणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारीमुळे, बल्लारपूर मतदार संघातील कॉंग्रेस- भाजपा उमेदवारांचे गणित बिघडणार असून, त्यांच्या उमेदवारीचा नेमका फटका कुणाला बसतो? हे निवडणूक रंगात आल्यानंतरच कळणार आहे.



'तयारी करा'या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे शब्दावर विश्वास ठेवून संदीप गिर्हे यांनी मागील एक वर्षापासून तयारी सुरू केली. भाजपाचे हेवीवेट नेते, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात तयारी करणे तसेही कठीण असतांना भाजपाचे विरोधात जावून, प्रसंगी गुन्हे दाखल करवून घेत शिवसेनेची बल्लारपूर मतदार संघात बांधणी केली. अनेक ग्राम पंचायत सरपंच, नगरसेवक, ग्रां.पं. सदस्य जोडले, नविन शाखाही उघडल्या.



ही शक्यता खरी निघाली आणि शिवसेनेने बल्लारपूरचा दावा सोडला. मात्र त्यानंतर अनेक घडामोडी घडत, बल्लारपूरमधून संदीप गिर्हे यांना पक्षाचे एबी फार्म देण्यात आले, नंतर ते परतही घेण्यात आले. 'खो_खो'चा हा खेळ सुरू असतांनाच, गिऱ्हे नेमके काय करणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. ही उत्सुकता गिर्हे यांच्या नामांकनाने संपली. बहुजनांवर या मतदार संघात अन्याय झाला आहे. बहुजनाच्या हितासाठी मी रिंगणार आहे. आता माघार नाही, कुणाचाही दबाव आला तरी, ही निवडणूक लढणार आणि जिंकणारच! असा विश्वास उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, संदीप गिर्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.