Accident News: देव दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी

Bhairav Diwase

अक्कलकोट:- अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याची दुर्दैवी घटना घडली.

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे देवदर्शन करुन गाणगापूरकडे जात असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमीना तातडीने अक्कलकोट येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी देखील पोलिसांनी संपर्क साधला आहे.