Bronze medal: महाराष्ट्राचे ए. एस. पठाण यांना ५ किमी चालण्यात कांस्यपदक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- मेंगलोर कर्नाटक्क येथे आयोजित पहिली मास्टर्स साऊथ एशिया मास्टर्स ॲथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ए. एस. पठाण यांनी ५ किमी चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्र वन विभागात आर.ओ. म्हणून कार्यरत असलेल्या पठाण यांनी राज्याचा गौरव वाढवला आहे.

या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतासह दक्षिण आशियातील विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ए. एस. पठाण यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदक पटकावले. या यशामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या क्षमतेचे पुन्हा एकदा प्रदर्शन झाले आहे.

स्पर्धेनंतर पठाण यांनी आपल्या यशाचे श्रेय कठोर सराव, संयम, आणि महाराष्ट्र वन विभागाच्या पाठिंब्याला दिले. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील क्रीडारसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकार आणि क्रीडा संघटनांकडून पठाण यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.