डिजिटल साक्षरते करिता भारतीय युवाशक्ती या विषयावर महाविद्यालयीन विशेष शिबिराचे उद्घाटन

Bhairav Diwase
चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित डिजिटल साक्षरते करिता भारतीय युवाशक्ती या विषयावर महाविद्यालयीन विशेष शिबिराचे आयोजन दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 पर्यंत ग्रामपंचायत विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. 

या शिबिराचे उद्घाटन आज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, प्रमुख अतिथी विसापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री अनकेश्वर मेश्राम, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.