Click Here...👇👇👇

Chandrapur accident: चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात

Bhairav Diwase
1 minute read
2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी


चंद्रपूर:- जिल्ह्यात कार आणि ऑटोचा भीषण अपघातझाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील येन्सा इथं ही घटना घडली आहे. जखमींवर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरु आहेत.

रामपूर येथे काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोऱ्याला जात होते. यावेळी चंद्रपूरकडे जाणाऱ्या बौद्ध भिक्षुकांच्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) यांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून एका गंभीर जखमी झालेल्या महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मजूर वरोरा येथील रहात असून मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते. यावेळी ही घटना घडली.