चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन सेपकटक्रॉ स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेते पद पटकाविले आहे.
गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन सेपकटाकरा मुला-मुलींची स्पर्धा गडचांदुर येथील शरदचंद्र पवार महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजेते पद खेचून आणण्याकरिता श्रुतिका वानखेडे, वैष्णवी मेश्राम, गायित्री इटनकर , मुस्कान शेख, नुपूर पांधारे यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले. तसेच या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांचा संघाने उपविजेतेपाद पटकाविले. उपविजेतेपद खेचून आणण्याकरिता रवी राजभर, सुमन सरकार , लोरीक यादव, पंकज बावरे, यश धकाते यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.
दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय वाढई, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बनसोड, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे,प्रा. विकी पेटकर, हनुमंतू डंबारे, निलेश बन्नेवार, कु. नागु कोडापे, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.