CDCC Bank Cyber Crime: चंद्रपूर पोलीसांनी वाचविले 1 कोटी 32 लक्ष रुपये!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- दिनांक ११ फेब्रुवारी, २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती CDCC बँक मर्या. चंद्रपूर येथील माहिती व तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दिनांक ०७/०२/२०२५ आणि १०/०२/२०२५ रोजी CDCC बँकेचे ऑनलाईन प्रकियेत प्रवेश (हॅक) करुन ३,७०,६४,७४२/- रुपयांची बँकेची फसवणुक केली आहे. यावरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायदाचे विविध कलमान्वये अज्ञात व्यक्तीविरुध्द अपराध क्रमांक ११४/२०२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


तत्पूर्वी सदर प्रकरणी संबंधीत बँक अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पो.स्टे. ला माहिती दिल्यावरुन वरुन दि. १०/०२/२०२५ रोजी नॅशनल सायबर गुन्हे रिपोर्टीग पोर्टलवर त्यांची तक्रार नोंदवुन झालेल्या एकुण ३३ ट्रॉन्झेक्शनवर फ्रिज लावण्यात आल्याने बँकेला ६०,६४,५८२/- रुपये परत जमा झालेली असुन ७१,३४,७३७/- रुपये विविध बैंक अकॉऊन्टला होल्ड झाले आहे. अद्याप पावेतो एकुण १,३१,९९,३१९/- रुपये वाचविण्यास चंद्रपूर पोलीसांना यश आला असुन उर्वरीत रक्कमे बाबत संबंधीत बँकशी पत्रव्यवहार करुन बँकेची आयटी टिम, सायबर टिम आणि पोस्टे रामनगर तपास पथक गुन्ह्याचा सखोल व तांत्रीक तपास करीत आहे.