संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे पैसे येत नाही मग हे करा

Bhairav Diwase
तहसीलदार कोरपना यांचे लाभार्थ्यांना आव्हान
आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी सतिश बिडकर, कोरपना 
कोरपना:- कोरपना तालुक्यातील अधिनिस्त संजय गांधी योजना / श्रावणबाळ योजना विभागांअतर्गत सर्व संबंधित लाभार्थ्यांना, सदरील योजनेअंतर्गत चे अनुदान माहे डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ पासुन DBT ( direct Benefit Transfer) portal मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले आधार कार्ड , मोबाईल क्रमांक , बँक खाते, पासबुक , हयात प्रमाणपत्र तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्रासह संबंधित ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी / ग्रामसेवक यांच्याकडे किंवा संबंधित तहसील कार्यालयात सादर केलेले नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान वरील कागदपत्राअभावी मुदतीत सादर न केल्यास त्यांच्या लाभ बंद होणार आहे. 

तरी सर्व संबंधित लाभार्थी यांनी उपरोक्त कागदपत्रे पुढील सात दिवसाचे आत (दि. ०९/०३/२०२५ पर्यंत ) संबंधित विभागाकडे सादर करावेत. तसेच ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्यावत नसेल त्यांनी आपले आधार कार्ड अपडेशन करून व संबंधित बँकेतून केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. लाभार्थींना अडचण आल्यास आपले संबंधित कोतवाल व ग्राम महसूल अधिकारी यांच्या कडून माहिती घ्यावी. असे आव्हान तहसीलदार आखरे मॅडम यांनी केले.