एकाच दिवशी महसुल व पोलीस विभागाची रेती चोरट्यांवर कारवाई

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी जितेंद्र माहूरे भद्रावती)
भद्रावती:- तालुक्यातील काही दिवसापूर्वीच चारगाव येथील पोलीसांनी रेती चोरांचा मुसक्या आवळल्या, तरी "नवके रेती सम्राट" कुठून तयार होते? या रेती चोरट्यांना गावातील नागरीकांना काही म्हटल की "तेरा क्या जाता" असे दिवसा "सफेद कपडे तर रात्रौ काळे" कपड्यातील मुजोर रेती तस्करांनी रेती चोरी करण्याकरीता "फौज" तयार केली. रेती चोरांचा फौज यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अत्यंत संवेदनशील महसुल अधिकारी व पोलिस यांचा हालचाली कडे लक्ष ठेवण्याकरीता सबंधीत रोजंदारीवर रोजंदार ठेवले असल्याची धक्कादायक माहीती प्राप्त झाली. एक सबंधित प्रशासन परीसरात रोजंदार, दूसरा मानोरा फाट्यावर तर तिसरा गावात असे "बेरोजगार" ठेवून रेती चोरी करतात, 
          या सर्व चोरट्यांना महसुल 'व' पोलीस प्रशासनाने चांगलाच धडा शिकवून प्रत्येकी दोन रेती भरलेले ट्रॅक्टर महसूल तर एक ट्रॅक्टर पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष पथकांनी ताब्यात घेतल्याची माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली.

     मिळालेल्या माहितीनुसार सदर कारवाई महसुल विभागाचे पथक रेती चोरून वाहतुक करीत असल्याचा तक्रारीवरून रात्रंदिवस काम करत तहसीलदार राजेश भांडारकर यांचा मार्गदर्शनात नायब तहसीलदार मनोज आकुनवार यांचा नेतृत्वात मंडळ अधिकारी समीर वाटेकर, तलाठी दिनेश भीसेकर, यांनी  
मौजा कारेगाव येथील अवैध व्यवसायातून रेती चोरी करतांना चालक विलास डाखोरे, मालक 'सुशांत कोटकर' यांना एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेत कारवाई केली.
     तसेच दुसरी कारवाई मौजा मुधोली येथील रुती भरलेला ट्रॅक्टरसह चालक विश्वास श्रीरामे तर मालक तुळशीराम श्रीरामे यांना ताब्यात घेत कारवाई केल्याची माहीती मिळाली.

   
भद्रावती पोलिसांचा अवैध रेती चोरीला आळा

        भद्रावती पोलिस हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबीर कडून मिळालेल्या माहितीनुसार मौजा मांगली गावा नजिक विवेकानंद शाळा जवळपास एक महिन्द्रा कंपनीचा लाल रंगाच्या ट्रक्टरमध्ये अवैधरीत्या रेती भरून चोरून वाहतुक करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंचासह सापळा रचला.
    या प्रसंगी माहितीनुसार वर्णनात्मक रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेत चालकाला नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे विकास भिमराव कोटनाके वय (३१ वर्ष) असे ट्रॉली मधील रेती मौजा मांगली नाला येथुन अवैध्यरित्या चोरून आणल्याचे सांगीतले.
       यावेळी सदर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता एक मंहीन्द्रा कंपनीचा २७५ DI लाल रंगाचा ट्रॅक्टर मुंडा क्र. एम एच ३४एल ६६६२ असा असुन ट्राली क्र. एन एच 34 ए पी 1205 लाल रंगाचे टॅक्टर ट्रॉलीमध्ये १ ब्रास रेती असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहन चालकास रेती वाहतुकीचा टि.पी. परवाना, रॉयल्टी व इतर कोणताही तत्सम परवाना आहे काय? याबाबत विचारणा केली त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले. 
       सदरची रेती ही अवैधरित्या मांगली नाला येथुन चारून आणल्याचे सांगीतले. चालकाला त्याचे मालका बाबत विचारपुस केली असता त्याने घनश्याम शेषराव उताने रा. मांगली यांचे मालकीचे असल्याचे सांगीतले. त्याच वेळी सदर मालक हे ट्रक्टर जवळ हजर झाले.
        तेव्हा ट्रॅक्टर मालक त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव घनश्याम शेषराव उताने वय (४९ वर्ष) रा. मांगली ता. भद्रावती असे सांगीतले त्यांना सुध्दा रेती वाहतुकीचा टि.पी. परवाना, रॉयल्टी व इतर कोणताही तत्सम परवाना आहे काय? याबाबत विचारणा केली असता त्यांनी रेती वाहतुकी बाबत कोणतेही कागदपत्र नसल्याचे ट्रक्टर मालकाने सांगीतले.
        त्यानुसार अवैध मुद्देमाल मिळून आल्याने लगेच पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून १ ब्रास रेती ५ हजार रेती भरलेला ट्रॅक्टर २ लाख ५ हजार रुपयांपर्यंत चा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींविरुद्ध कलम ३०३(२)३ (५) भादंवी सहकलम ४८ जमीन महसुल अधि. १९६६ पोलिस स्टेशन भद्रावती अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली.
         सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांचा नेतृत्वात जगदिश झाडे, योगेश घाटोळे रोहीत चिठगिरे निकेश ढेंगे विश्वनाथ चुदरी, अनुप आष्टणकर यांनी केली.