Dhananjay Munde Resignation: महायुतीची पहिली 'विकेट' पडली! धनंजय मुंडे यांचा राजीनामा

Bhairav Diwase


मुंबई:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करीत होते.


मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे पीए प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला असून पुढील कारवाईसाठी राज्याचे राज्यपाल यांच्याकडे पाठवीला आहे. असे प्रसार माध्यमांनी बोलताना सांगितले.