Raksha Khadse: केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड

Bhairav Diwase

जळगाव:- जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.


दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर येताच रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुलींचं काय? असा संतप्त सवाल मंत्री रक्षा खडसेंनी उपस्थित करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, त्यांना अटक तर झालीच पाहिजे, त्याशिवाय मी मानणार नाही. एवढी सुरक्षा असून सुद्दा या मुलांचा हेतू एवढा खराब असेल, तर बाकीच्या मुलींचं काय? असा संतप्त सवाल रक्षा खडसे यांनी केला आहे. मी या प्रकरणाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी देखील बोलली आहे. यावर तुम्ही तात्काळ कारवाई करा, त्याला आत्ताच उचलून आणा, असं म्हणत रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या असल्याचं पाहायला मिळालं.