सदर घटना दि.२० मे मंंगळवारला दुपारी १२.३० वाजता घडली. ईश्वर जगन्नाथ कुसराम (५४) व रंजीता सुधाकर तोडासे (४२),सुलका किर्तीराम आलाम (६०) तिघेही रा.भटाळी, ता.पोंभुर्णा असे मृतकांची नाव आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्या तिघांवरही बुधवार दि.२१ मे ला भटारी येथे अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी भटारी गावात दुःखद वातावरण असून गावात शोककळा पसरली आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील भटारी व देवई येथील २९ नागरिक मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली येथे देवकारणासाठी कार्यक्रमासाठी जात होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या पीक अप वाहनाचे रेंगेवाही पुलाजवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने वाहनाची झाडाला जबर धडक बसली.त्या गाडीत दबून ईश्वर कुसराम याचा जागीच मृत्यू झाला. तर रंजीता तोडासे हिचा चंद्रपूरला उपचारासाठी नेतांना मृत्यू झाला. तर सुलका आलाम हिचा चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.मृतक तिघांनाही दि.२१ मे बुधवारला भटारी येथे आणण्यात आले व तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे भटारी गावात शोककळा पसरली आहे.
लीना सोयाम,दशरथ तोडासे,अनुसया कुसराम यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अति दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
गंभीर जखमींमध्ये- अलका वेलादी, दुर्योधन कुंभारे, कांता तोडासे, सखु तलांडे, गंगू शेडमाके, सुलका आलाम, शांता तोडासे, विशाल शेडमाके, रंजीता तोडासे, रंजू कुंभारे, गंगू वेलादी, कांता तोडासे, करण वेलादी, दोडाजी आत्राम, कविता वेलादी, संपत वेलादी, आशा शेडमाके, रखमा वेलादी, रामदास शेडमाके, सपना नैताम, खुषाबराव सिडाम, विलास कुसराम हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आष्टी व चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.