मुल:- वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातून समोर आली आहे. करवन शेतशिवारात गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली, जिथे ५५ वर्षीय बंडू परशुराम उराडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, बंडू उराडे हे आपल्या घरातील गुरे चारण्यासाठी गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वन अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण गेल्या १२ दिवसांत वाघाने आतापर्यंत एकूण नऊ जणांचा बळी घेतल्याची माहिती आहे. वनविभाग या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.