चंद्रपूर:- भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास नागरिकांना ओलीस ठेवल्यास त्यांची सुटका कशी करावी, याचे प्रात्यक्षिक आज चंद्रपूर येथील श्री. माता महाकाली मंदिर परिसरात जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला.
दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरात चार दहशतवादी घुसले आणि त्यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून ओलीस ठेवले, अशी माहिती दुपारी २:४० वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी तात्काळ नियंत्रण कक्षातून वरिष्ठांशी समन्वय साधला आणि सर्व पथकांना घटनास्थळी पाचारण केले.
या पथकांमध्ये दहशतवाद विरोधी शाखा (ATB), जलद प्रतिसाद कमांडो पथक (QRT), दंगा नियंत्रण पथक (RCP), बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक (K9), नक्षल सेल तथा नक्षल विरोधी अभियान पथक (C-60), सुरक्षा शाखा, चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलीस स्टेशनचे विविध पोलीस पथके, वाहतूक नियंत्रण पोलीस पथक, आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी व अंमलदार यांचा समावेश होता. पोलीस रुग्णालय वैद्यकीय पथकही रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर झाले.
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, सुधाकर यादव तात्काळ घटनास्थळी पोहोचले. श्रीमती रिना जनबंधू यांनी परिस्थितीची सूत्रे हाती घेतली आणि सुधाकर यादव यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सर्व पोलीस पथकांनी योग्य खबरदारी घेऊन कोणतीही जीवितहानी न होता, मंदिरात घुसलेल्या दहशतवाद्यांचा यशस्वीरित्या खात्मा करून ओलीस असलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका केली.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण टाळण्यासाठी उपाययोजना
या प्रात्यक्षिकादरम्यान मंदिर परिसरात आणि शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
यशस्वी योगदानात सहभागी अधिकारी:
या प्रात्यक्षिकाला यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, श्री. सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात प्रमोद चौगुले, परि. पोलीस उपअधीक्षक, प्रवीण कुमार पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, श्रीमती प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. चंद्रपूर शहर, धर्मेंद्र मडावी, सहा. पोलीस निरीक्षक, C-60, प्रवीण सोनोने, सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक, शिरभाते, पोलीस उपनिरीक्षक, सुरक्षा शाखा, खोंडे, पोलीस उपनिरीक्षक, BDDS, भोयर, पोलीस उपनिरीक्षक, ATB, पोलीस वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरेशी याशिवाय, चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलीस स्टेशनचे तसेच वर नमूद केलेल्या विविध शाखा/विभागांचे अधिकारी व अंमलदार यांनीही या प्रात्यक्षिकात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.