Pombhurna Sand allocation : पोंभूर्णा तालुक्यातील घरकुलांना पाच ब्रास रेतीचे वाटप

Bhairav Diwase

पोभूर्णा:- तालुक्यातील पंचायत समिती पोभूर्णा अंतर्गत ३१ ग्रामपंचायततील ग्रामीण घरकुल पात्र लाभार्थी ३४९७ तसेच नगर पंचायत पोभूर्णा अंतर्गत शहरी घरकुल पात्र लाभार्थी १४८ असे एकूण पात्र घरकुल लाभार्थी संख्या ३६४५ यांना प्रति घरकुल ५ ब्रास प्रमाणे रेतीचे वितरण दि.२२ मे पासून महसुल विभागामार्फत जामतुकून,घाटकुळ,भीमणी,मोहाडा (रै.),टोक, चेक बल्लारपूर-१,चेक बल्लारपूर-२, थेरगाव, कोसंबी रीठ,आष्टा या रेती घाटातून सुरु करण्यात आले आहे. संबधीत पात्र घरकुल लाभार्थी यांनी त्यांना नेमूण दिलेल्या खालील रेतीघाटातून ५ ब्रॉस वाळू प्राप्त करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार रेखा वाणी यांनी केले आहे.

🛜
तालुक्यात अंधारी व वैनगंगा नदी आहे. मात्र तालुक्यातील एकही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना रेतीची मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी शासनस्तरावर अनेक निवेदने देण्यात आले होते. अखेर शासनस्तरावरून घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेतीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोंभूर्णा तालुक्यात दि. २२ मे २०२५ ला ठरवून दिलेल्या रेती घाटातून रेती देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पंचायत समिती पोभूर्णा अंतर्गत ३१ ग्रामपंचायततील ग्रामीण घरकुल पात्र लाभार्थी ३४९७ तसेच नगर पंचायत पोभूर्णा अंतर्गत शहरी घरकुल पात्र लाभार्थी १४८ असे एकूण पात्र घरकुल लाभार्थी संख्या ३६४५ यांना प्रति घरकुल ५ ब्रास प्रमाणे रेतीचे वितरण करण्यात येणार आहे.संबधीत पात्र घरकुल लाभार्थी यांनी त्यांना नेमूण दिलेल्या खालील तात्पुरते रेतीघाटातून ५ ब्रॉस वाळू प्राप्त करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार रेखा वाणी यांनी केले आहे.

🛜
५ ब्रास वाळू प्राप्त करण्याकरीता घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, सोबत मोबाईल आणावे, ग्रामसेवकांनी दिलेली टिपी सोबत आणावे. तसेच ट्रॅक्टर व ट्रॉली वाहनावर नंबर टाकून असलेले वाहन व मजूरासह नेमुन दिलेल्या १० रेतीघाटात सकाळी ६ ते सांयकाळी ६ या वेळेत उपस्थित राहून रेती प्राप्त करुन घ्यावी.

🛜
जामतुकूम, देवाडाखुर्द, चकहत्तीबोडी, सातारा भोसले, चक आंबेधानोरा, जामखुर्द, घाटकूळ, भिमणी, मोहाळा रै., वेळवा, नवेगाव मोरे, टोक,चकठाणा, चकठाणेवासना, पिपरी देशपांडे, दिघोरी, जुनगाव, देवाडा (बुज.), चकबल्लारपूर, केमारा, आष्टा, चिंतलधाबा, चेकआष्टा, बोर्डाझुल्लूरवार, थेरगाव, फुटाणा, घोसरी, चकफुटाणा, कोसंबी रिठ, उमरी पोतदार, आष्टा, बोर्डा बोरकर, घनोटी तुकूम, कसरगट्टा,व पोभूर्णा (नगर पंचायत क्षेत्र) या गावांना मिळणार आहे लाभ.