Airplane crash: एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक

Bhairav Diwase

गुजरात:- गुजरातच्या अहमदाबादमधीलएअर इंडियाच्याविमान अपघाताबाबत मोठी बातमी येत आहे. २४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे विमानअहमदाबाद विमानतळाबाहेरील परिसरात असलेल्या डॉक्टरांसाठीच्या हॉस्टेलवर कोसळले आहे.

यामुळे हॉस्टेल परिसरातील वाहने जळून खाक झाली असून हॉस्टेलमधील विश्रांती घेत असलेले डॉक्टर, कर्मचारी यांच्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागात कोसळले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले ती इमारत डॉक्टरांचे हॉस्टेल असल्याचे तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राथमिक माहितीनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहात कोसळले आहे. २-३ मिनिटांत पोलिस आणि इतर एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या. जवळजवळ ७०-८०% परिसर रिकामा करण्यात आला आहे. सर्व एजन्सी काम करत आहेत. कृपया नागरिकांनी रस्ते मोकळे ठेवावेत, जेणेकरून जखमींना ग्रीन कॉ़रिडॉर करून हॉस्पिटलमध्ये नेता येईल.'' या अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.