Ahmedabad Plane Crash : माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे दु:खद निधन

Bhairav Diwase

गुजरात:- अहमदाबादहून एक गंभीर आणि दु:खद घटना समोर आली आहे. एअर इंडियाचे एक विमान कोसळल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे. या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे दु:खद निधन झाले आहे, विमानतळावर मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अग्निशमन दल आणि बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत.

एअर इंडियाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात एकूण १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वैमानिकांसह २५ प्रवासी समाविष्ट आहेत. दुर्घटनास्थळी मदत कार्यासाठी वडोदऱ्यातून २५ अग्निशमन कर्मचारी आणि २०० बचाव कर्मचारी अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

अहवालानुसार, विजय रूपाणी यांची पत्नी अंजली रूपाणी सध्या लंडनमध्ये आहेत आणि ते त्यांना परत आणण्यासाठी लंडनला निघाले होते, असे सांगितले जात आहे.