अहमदाबाद:- गुजरातच्या अहमदाबादेत प्रवासी विमान कोसळून भीषण दुर्घटना (Ahmadabad Plane Crash) घडली. तब्बल 242 प्रवाशांसह हे विमान दुपारी दीडच्या सुमारास उड्डाण केलं होतं. अहमदाबादवरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान (Air India Plane ) उड्डाणाच्या काही वेळातच कोसळलं.
या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानातून प्रवास करत होते. हे विमान नेमकं दुर्घटनाग्रस्त कसं झालं, अपघात नेमका कसा घडला याबाबतची कारणं तपासात समोर येतील. मात्र या बोईंग विमानाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathi) यानेही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ध्रुव राठी म्हणतो, 'इतिहासात प्रथमच B-787 Dreamliner विमान क्रॅश झालं आहे. एक अत्याधुनिक आणि अतिशय सुरक्षित विमान मानलं जातं. खूपच धक्कादायक आहे"
This is the first time in history that a B-787 Dreamliner plane has crashed.
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) June 12, 2025
It is considered to be one of the safest aircrafts. Absolutely Shocking!