Panchayat 4 VIDEO: "देख रहा है बिनोद...";'पंचायत'चा चौथा सीझन आला, धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

Bhairav Diwase

लोकप्रिय सीरिज 'पंचायत सीझन 4' (Panchayat 4 Trailer) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पंचायत सीझन 4' चा मजेदार ट्रेलर प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'पंचायत सीझन 4' ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज आहे.

'पंचायत सीझन 4' सीरिजचे लेखन चंदन कुमार यांनी केले आहे आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी सांभाळली आहे.


'पंचायत सीझन 4' सीरिज 24 जून 2025 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतासह जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर 'पंचायत सीझन 4' पाहता येणार आहे. 'फुलेरा' गावात राजकीय रणसंग्राम रंगणार आहे. 'पंचायत सीझन 4' काल्पनिक 'फुलेरा' गावावर आधारित असून , यावेळी गावात सत्तासंघर्षाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

'पंचायत सीझन 4' मध्ये मंजू देवी आणि क्रांती देवी आमनेसामने उभ्या असून गावात रॅली, भाषणं, घोषणा आणि एकमेकांवर टीका-टिप्पणीचा धडाका लागलेला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 'पंचायत सीझन 4'च्या ट्रेलरमध्ये गावाचे वातावरण अक्षरशः मेळ्यासारखे भासते. ढोल, ताशा आणि देसी प्रचार गाण्यांसह ट्रेलरमध्ये धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

'पंचायत सीझन 4' स्टारकास्ट

'पंचायत सीझन 4'मध्ये तगडे कलाकार पाहायला मिळाणार आहेत. यात जितेन्द्र कुमार , नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे कलाकार आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणार आहेत.