नागपूर:- झाडावर चढून आंबे तोडताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्वेनगर या भागात ही घटना घडली.
🥳
सुर्वेनगरमधील रहिवासी मून यांच्या घरी आंब्याचे झाड आहे. तेथे बागकाम करणारे राम वासुदेव साठवणे (४१, रा. इसासनी) हे बागकाम करताना आंब्याच्या झाडावर चढले व आंबे तोडू लागले हे करताना त्यांचा स्पर्श जिवंत विद्युत प्रवाहित तारेला झाला. विजेचा धक्का बसताच ते खाली पडले व बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने एम्समध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.