Police Bharti : राज्यात लवकरच पोलीस भरती होणार; गृहमंत्र्यांनी विधानभवनात दिली माहिती

Bhairav Diwase

मुंबई:- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. मागील ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले.



पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रात १३,५६० जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाला असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.