चंद्रपूर:- पर्यावरणवादी सुप्रसिध्द कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना खोटया गुन्हयामध्ये अटक करून जोधपूर येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. आणि दिनांक 6 ऑक्टोंबरला भारताचे मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांचेवर जोडा भिरकवण्याचा प्रयत्न झाला. या दोन्ही घटना संविधान विरोधी असून लोकशाही मुल्यांना तडा देणाऱ्या आहेत. म्हणून याचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर येथील विविध फुले आंबेडकरी संघटनातर्फे शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रसिध्द व्यवसायिक तथा थेंब ग्रुपचे अध्यक्ष ॲड. राजेश वनकर यांचे अध्यक्षतेखाली सदर धरना आंदोलन दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर एका शिष्टमंडळाव्दारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत मान, राष्ट्रपती व मान. प्रधानमंत्री, भारत सरकार यांना निवेदन पाठविण्यात येईल.
अलिकडे संविधानाचा अवमान करणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या संविधानिक अधिकारावर निर्बंध लादल्या जात आहेत. भारतातील लोकशाही व्यवस्था संपवून हुकूमशाहीच्या दिशेन वाटचाल सुरू असून सध्या अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती आहे. फुल आंबेडकरवादी जनता ही लोकशाही आणि संविधानवादी असल्याने हे प्रकार खपवून घेणार नाही.
वरील दोन्ही घटनांमुळे या समूहाच्या भावना तीव्र झाल्या असून त्या प्रकट करण्यासाठी वरील धरना आंदोलन आयोजित केला आहे. या धरण्यात समता सैनिक दल, भीम आर्मी, फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती, बाणाई, बहुजन हितकारीणी सभा, बहुजन युवा कृती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोशिएसन, बुध्दीस्ट समन्वय कृती समिती व इतर सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. तेव्हा सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप वावरे, किशोर सवाने, सुरेद्र रायपूरे, राजकुमार जवादे, प्रा. टि.डी. कोसे, नागवंश नगराळे, चेतन उंदीरवाडे, ॲड. अशोक फुलझेले, धम्मदिप मेश्राम, अंनता बाभरे, ॲड. रविंद्र मोटघरे, विद्याधर लाडे, विवेक कांबळे, बंडू ठमके, अशोक टेंभरे, रविंद्र भैसारे, किशोर तेलतुंबडे उपस्थित होते.