निवेदन देऊनही कार्यवाही का नाही?
बल्लारपूर:- सविस्तर वृत्त असे की, बल्लारपूर येथील पेपर मिल (बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड) समोरील मुख्य रोडवर कंपनीच्या अवजड वाहनांची (ट्रक, लॉरी इत्यादी) नो पार्किंग झोनमध्ये रोडवर अनधिकृतपणे नेहमीचं उभी राहत तात, यामुळे बल्लारपूर ते चंद्रपूर मुख्य महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असून, अपघातांच्या घटना ही दिवसेंदिवस वाढतचं चालल्या आहेत.
या समस्येमुळे स्थानिक रहिवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो आणि सुरक्षिततेचा धोका देखील निर्माण होतो. कंपनीच्या वाहनांना पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध असूनही, ते रोडवर नो पार्किंग मध्ये रस्त्यावर गाडी उभी करून नियमांचे उल्लंघन करत आहेत. सदर बाब प्रशासनाचा निदर्शनास आणून भविष्यात होणारे अपघात टाळण्याकरिता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिनांक- 14 नोव्हेंबर 2025 रोजी निवेदन करत
सदर समस्येचे तात्काळ निवारण करून कंपनीमधील जे वाहन रस्त्यावर उभे असतात त्या वाहनांवर तात्काळ कार्यवाही करून भविष्यात नो पार्किंग मध्ये कंपनीचे अवजड वाहन रस्त्यावर उभे राहता कामा नहे अशी ठाम मागणी करत वाहनांकरिता कंपनीने दिलेल्या पार्किंग मध्येच कंपनीच्या गाड्या रहाव्यात अशी चेतावणी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी दिले आहे.
परंतु बल्लारपूर येथील पोलीस प्रशासनाने सदर निवेदनाची अद्याप गांभीर्याने दखल घेतली नसून त्यांच्या या बेजबाबदार भूमिकेने *बल्लारपूर पोलीस कुणाच्या मरणाची वाट पाहत आहेत*??? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. कारण
निवेदन देऊनही अजुन कार्यवाही का नाही करण्यात आली? पोलीसांच्या या भूमिकेने कंपनी प्रशासनाशी पोलिसांचे काही आर्थिक साठे लोटे तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. आशा आहे या सर्व शंकांचे समाधान पोलीस प्रशासनाच्या कडक कारवाईनंतरच होईल.


