Police Bharati : पोलीस भरतीत EWS प्रमाणपत्राच्या गैरवापरावर कारवाईची मागणी; जिल्हाधिकारी यांना निवेदन

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती-२०२४-२५ मध्ये सहभागी होणा-या अन्य प्रवर्गाच्या उमेदवारांनी EWS प्रमाणपत्र तयार करून पोलिस शिपाई भरतीमध्ये सहभागी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

EWS प्रवर्गाचा कट-ऑफ (Cut-Off) इतर प्रवर्गापेक्षा कमी लागत असल्याने, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या सक्षम तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवार 'बनावट' किंवा 'अपात्र' EWS प्रमाणपत्रे मिळवून भरतीत सहभागी होत असल्याचा गंभीर आरोप EWS उमेदवारांनी केला आहे.


मुस्लिम धर्मियांमधील काही जाती ह्या महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणाचा लाभ घेतात. हे लोक पण EWS प्रमाणपत्र तयार करून महाराष्ट्र शासनाच्या डोळयात धुळ झोकत आहेत. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवार की ज्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न रूपये ८.०० लक्ष पेक्षा कमी आहे अशा उमेदवारांवर अन्याय होत आहे.


EWS उमेदवारांची मागणी:
प्रमाणपत्रांचा गैरवापर करणाऱ्या 'दोषी' उमेदवारांवर योग्य व कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि खऱ्या EWS प्रमाणपत्र धारक उमेदवारांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, अशा अपात्र उमेदवारांना EWS प्रमाणपत्रे तयार करून देणाऱ्या संबंधितांवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी EWS उमेदवारांनी केली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या ध्येय-धोरणांवर आणि आरक्षण प्रक्रियेच्या पावित्र्यावर परिणाम करणाऱ्या या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी EWS उमेदवारांनी केली आहे.