चंद्रपूर:- भाजपचे ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निमित्त ठरलंय त्यांचं एक विधान, जे सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरतंय. अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं... पण नुसतं वाटल्याने तसं होत नाही...
चंद्रपुरात आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुनगंटीवार यांनी हे विधान केलं. कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी शेवटी पक्षाचा निर्णय आणि राजकीय परिस्थिती महत्त्वाची असते, हेच मुनगंटीवारांना सुचवायचं होतं का? की या विधानामागे काही सुप्त नाराजी आहे? अशा चर्चांना आता वेग आला आहे.

