राज्य पत्रकार संघाची मोठी घोषणा; सोशल मीडिया जिल्हा संघटकपदी शाम चटपल्लीवार तर तालुका अध्यक्षपदी विनोद वांढरे यांची नियुक्ती.

Bhairav Diwase
भद्रावतीतील हॉटेल सेलिब्रेशन हॉल येथे झालेल्या बैठकीत निर्णय


   भद्रावती (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (शाखा चंद्रपूर) यांच्या वतीने संघटनेच्या डिजिटल माध्यमातील कामकाज अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाम नथ्थुजी चटपल्लीवार यांची सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हा संघटक तर विनोद वांढरे यांची सोशल मीडिया भद्रावती तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
     प्रसंगी भद्रावती येथील हॉटेल सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित बैठकीदरम्यान ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.


      ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक राज्य संघटक संजयजी भोकरे, राज्य अध्यक्ष गोविंद वाकोडे, राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमानी, राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव तसेच डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे यांच्या माहितीस ठेवून राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.
     दरम्यान नवीन पदभार स्वीकारल्यानंतर शाम चटपल्लीवार व विनोद वांढरे हे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूरचे जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य करणार आहेत.
    या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अक्षय मन्ने यांच्या हस्ते नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
     यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई भद्रावती शाखेचे तालुका अध्यक्ष संतोष शिवणकर, राजुरा तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, सरचिटणीस सुनील दैदावार, महेश निमसठकर, अनिल इंगोले, पुंडलिक येवले, वैभव निंबाळकर, पवन जिवतोडे,ञ अतुल वनकर तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
     बैठकीदरम्यान नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व पत्रकार बांधवांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच संघटनेची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही पदाधिकारी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करतील, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.