अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील वडगाव पोलीस चौकीच्या अगदी समोर असलेल्या वर्दळीच्या व व्यावसायिक इमारत असलेल्या गज टॉवरला अचानक आग लागली. या टॉवरमध्ये अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि दुकाने असल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली होती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, परिसरात दाट दुकाने असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यामुळे कोट्यवधींची मालमत्ता सुरक्षित राहिली असून एक मोठा अनर्थ टळला आहे. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

