सत्र न्यायालयात आरोपीस जामीन मंजूर ॲड. उमेश मोहूर्ले यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक.

Bhairav Diwase

चंद्रपूर:- नागभीड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अपराध क्र. 160/2026 मधील कलम 103 बीएनएस अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी मंगेश सेलोटे (रा. नागभीड, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) यास मा. सत्र न्यायालय चंद्रपूर यांनी जामीन मंजूर केला आहे.
सदर जामीन अर्जावर मा. न्यायाधीश श्री. मुठाळ यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. आरोपीच्या वतीने ॲड. उमेश मोहूर्ले यांनी प्रभावी व सविस्तर युक्तिवाद करत आरोपीस जामीन मंजूर करण्याची विनंती केली. प्रकरणातील उपलब्ध पुरावे, तपासाची सद्यस्थिती तसेच जामीन देण्यास अनुकूल असलेल्या विविध कायदेशीर मुद्द्यांवर ॲड. मोहूर्ले यांनी न्यायालयासमोर सखोल मांडणी केली.


  ॲड. उमेश मोहूर्ले यांच्या भक्कम युक्तिवादाची दखल घेत मा. सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज दि. 10 जून रोजी मंजूर केला. न्यायालयाच्या या आदेशामुळे आरोपीस मोठा दिलासा मिळाला आहे.


या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अधिवक्ता श्री. संदीप नागपुरे यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान न्यायालयीन वर्तुळात ॲड. उमेश मोहूर्ले यांनी केलेल्या प्रभावी कायदेशीर मांडणीमुळेच आरोपीस जामीन मिळण्यास मदत झाल्याची चर्चा असून त्यांच्या युक्तिवादाचे कौतुक होत आहे.
Tags