Chandrapur Rain Update: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा तांडव; चंद्रपूर-नागपूर महामार्ग जलमय!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट' जारी केला असून काल रात्रभरापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. रात्रभर झालेल्या पावसाने सकाळी ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या धुवांधार पावसामुळे चंद्रपूर-नागपूर महामार्ग जलमय झाला असून महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक काम नसताना प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.