Pombhurna News: पोंभुर्णा येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन; भाजपातर्फे उत्साहात वृक्षारोपण संपन्न!

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि प्रखर राष्ट्रवादी नेते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी पोंभूर्णा तालुक्याच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
केवळ अभिवादनच नव्हे, तर या निमित्ताने 'एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया' असा संदेश देत पोंभूर्णा तालुक्यात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. हा संपूर्ण कार्यक्रम राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप जिल्हाध्यक्ष मा. हरीश भैय्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.


यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचे स्मरण केले. "एक देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण चालणार नाही" या त्यांच्या ऐतिहासिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.


या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा पोंभूर्णा तालुक्याचे तालुका अध्यक्ष हरीश ढवस यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. या वृक्षारोपण मोहिमेत परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.