Chandrapur News: चंद्रपूरमधील तुकूम परिसरात दहिहंडीचा थरार

Bhairav Diwase
तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमानतर्फे भव्य आयोजन!

चंद्रपूर:- श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शहरातील तुकूम परिसरात एका भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या उत्सवाने संपूर्ण चंद्रपूर शहरात गोकुळाष्टमीचा आनंद द्विगुणीत केला आहे.

या दहिहंडी उत्सवात चंद्रपूर शहरातील विविध गोविंदा पथके थरारक मानवी रचना करण्यासाठी आणि दहिहंडी फोडण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली होती. गोविंदांच्या अंगातील जोश आणि उपस्थितांचा उत्साह पाहण्यासारखा होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांनी आणि गोविंदाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या दिमाखदार सोहळ्याला वणी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार संजय देरकर यांनी प्रमुख उपस्थिती होती.


हा संपूर्ण सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी सुरेश पचारे आणि विक्रांत सहारे यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. जय शितला माया मंदिर च्या पथक दहिहंडी फोडत पहिले पारितोषिक पटकाविले.