चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या पुढाकाराने चंद्रपूर पोलिस दलाने ‘एक कॉन्स्टेबल, एक गणपती’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळात थेट संवाद प्रस्थापित होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मोठी मदत मिळणार आहे. Chandrapur
मंडळांची वाटप जबाबदारी: जिल्ह्यातील तब्बल दोन हजार सार्वजनिक गणेश मंडळांची थेट जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. Police station Chandrapur
मोठ्या मंडळांची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे: शहरातील किंवा जिल्ह्यातील नावाजलेली आणि मोठ्या स्वरूपाची सार्वजनिक गणेश मंडळे थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहेत.
थेट संवाद आणि समन्वय: प्रत्येक मंडळासाठी एक स्वतंत्र पोलीस कर्मचारी नेमल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रशासनात कोणताही दुवा न राहता थेट संवाद साधला जाईल.
तातडीने नियंत्रण: नियमांचे उल्लंघन किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवणे या उपक्रमामुळे शक्य होईल.
DJ आणि साऊंड सिस्टीमसाठी कडक अटी
उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनिप्रदूषण आणि नियमांच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. डीजे (DJ), साऊंड सिस्टीम, आकर्षक लायटिंग आणि विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात शासनाने व न्यायालया, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे तंतोतंत पालन करणे प्रत्येक मंडळासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. DJ Chandrapur
नागरिकांसाठी आणि मंडळांसाठी महत्त्वाची विनंती:
गणपती बाप्पाचा हा पवित्र उत्सव आनंदाने आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, तरुण कार्यकर्ते आणि नागरिकांना प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात हा गणेशोत्सव पार पाडण्यासाठी चंद्रपूर पोलीस अहोरात्र सज्ज आहेत. Chandrapur police
