'Not Me But You'चा संदेश देत सरदार पटेल महाविद्यालयात NSS स्थापना दिन साजरा; उत्कृष्ट स्वयंसेवकांचा सन्मान

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित, येथील सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील अब्दुल शफी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठा प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी भूषविले. व्यासपीठावर शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख आणि डॉ. वंदना खनके प्रामुख्याने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, समाजात आणि महाविद्यालयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिबिरार्थी, स्वयंसेवक आणि स्वयंसेविकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही देशसेवेची व समाजकार्याची नवी ऊर्जा निर्माण झाली.


विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या इतिहासावर आणि महत्त्वावर प्रकाश टाकला. 'नॉट मी बट यू' (मी नव्हे, तर तू) या एनएसएसच्या मूलभूत मंत्राचा अर्थ समजावून सांगत, विद्यार्थ्यांनी नेहमी निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.


या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना कैथल हिने केले, तर उपस्थितांचे आभार ऋतूजा लेनगुरे हिने मानले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे हा स्थापना दिन सोहळा अतिशय यशस्वी ठरला.