Pombhurna News: गणेश विसर्जनाला गालबोट

Bhairav Diwase
पोंभुर्ण्यात पोलीस आणि मंडळात राडा, शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात

चंद्रपूर:- जिथे लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणावपूर्ण घटना समोर आली आहे. विसर्जनस्थळाकडे मार्गस्थ होत असलेल्या विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलीसांमध्ये बाचाबाची झाली, ज्याचे रूपांतर नंतर मारहाणीत झाले. त्यानंतर पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला. सध्या संपूर्ण पोंभुर्णा शहरात तणावाचे वातावरण असून मुख्य चौकात मोठा वाद पेटला आहे.


व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा:- https://www.instagram.com/adharnews04?stkn=MWl3azhqM3h3Mjdo

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोंभुर्णा येथील 'विघ्नहर्ता गणेश मंडळ' आपली विसर्जन मिरवणूक घेऊन विसर्जनस्थळाकडे मार्गस्थ झाले होते. यादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारी आणि धक्काबुक्कीमध्ये झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा व दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नेमके लक्ष ठेवून आहेत.